आ. आंबटकर, अनिल जोशी मानस युनिट 3 च्या उपाध्यक्षपदी

    दिनांक :20-Feb-2021
|
वर्धा,
मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जामणी येथील युनिट 3 च्या उपाध्यक्षपदी आ. डॉ रामदास आंबटकर आणि वर्धा नागरी सहकारी बँकेचे संचालक अनिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानस युनिट 3 चे संचालक म्हणून आ. पंकज भोयर, अर्चना वानखेडे तर वर्धा जिपच्या शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे (लांबट) यांची युनिट 1 बेला येथे संचालक म्हणून निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
ambatkar_1  H x
 
यावेळी महात्मा शुगर अ‍ॅण्ड पॉवरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे, मानसचे संचालक सारंग गडकरी, समय बनसोड, जयकुमार वर्मा, आनंद राऊत, अनिल मेंढे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करायला हवे. साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस लागवड वाढली पाहिजे आणि या माध्यमातून शेतकर्‍यांना अधिक फायदेशीर शेती कशी करता येईल यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.