तपासणी नाक्यावर तहसीलदार मांजरे यांनी दिली भेट

    दिनांक :20-Feb-2021
|
उंबर्डा बाजार,
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता 20 फेब्रुवारी पासुन जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोमठाणा फाटा येथे तपासणी नाका सुरू करण्यात आला असून, बाहेर जिल्ह्यातुन येणार्‍या वाहनांची कडक तपासणी करण्यात येऊन कोवीड आरोग्य विषयक निमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
 
 
bhet_1  H x W:
 
यवतमाळ, अकोला तथा अमरावती जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रभाव दिसत असूनख तिन्ही जिल्ह्याच्या सिमा वाशीम जिल्ह्याला लागुन असल्याने जिल्हा प्रशासनाने यवतमाळ व वाशीम जिल्ह्याची सिमा असलेल्या कारंजा - दारव्हा मार्गांवरील सोमठाणा फाटा येथे तपासणी नाका सुरू करण्यात आले. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यत सहा वाहन चालकांवर मुखाच्छादन चा वापर केला नसल्याने आढळून आले असल्याने दंडात्मक कारवाई करून 3000 रूपये दंड वसुल करण्यात आला. तपासणी नाक्याला कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी भेट देऊन उपस्थित कर्मचारी मंडळीना आवश्यक मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
 
 
 
तपासणी नाक्यावर कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तमराव गोलाम व वाहतूक शाखेचे जमादार संतोष राठोड वाहनांची तपासणी करण्यात येत असून, उंबर्डा बाजार आरोग्य वर्धिनी केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. नांदे यांचे मार्गदर्शनात रवि बागडे, जयश्री श्रीरामे तथा अनिता धारपवार आरोग्य विषयक तपासणी कामात मदत करीत आहे.