विदर्भ संघाची विजयी आगेकूच

    दिनांक :20-Feb-2021
|
- पंजाब, वेस्ट बंगालचाही विजय
- दिव्यांग राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा
नागपूर, 
लोकेश मरघडेच्या नाबाद अर्धशतकी आणि अझहर शेखच्या आक्रमक ५४ धावा तसेच इरशाद खानच्या भेदक माèयाच्या बळावर विदर्भ संघाने छत्तीसगढ संघाचा ६१ धावांवर धुव्वा उडवित कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या राष्ट्रीय कोशिश प्रिमियर क्रिकेट स्पर्धेत शनिवारच्या लढतीत विजय नोंदवित स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.
 

divyang12_1  H  
 
 
 
वसंत नगरच्या मैदानावर झालेल्या विदर्भ विरुद्ध छत्तीसगढ अशी लढत रंगली. सामन्यात नाणेफेक जिंकून विदर्भ संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भ संघाने २० षटकांत सात गडी गमवित तब्बल २०१ असा धावडोंगर उभारला. फलंदाजीत लोकेश मरघडेने ५८ चेंडूत नाबाद ७५ धावा तर अझहर शेखने अवघ्या २० चेंडूत ५४ धावा करीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
 

गोलंदाजीत राजेंद्र देशमुखने दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात छत्तीसगढचा संघ इरशाद खान आणि सारंग चाफलेच्या भेदक माèयासमोर १५ षटकांत सर्वगडी गमवित ६१ धावांवरच गारद झाला. फलंदाजीत तमिम धु्रव आणि संदीप वर्मा या दोन फलंदाजांना वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारण्यात देखील यश आले नाही. तर तब्बल पाच फलंदाजाला एकही धाव उभारता आली नाही.

तर डॉ. आंबेडकर मैदानावर झालेल्या दुसऱ्या  सामन्यात वेस्ट बंगालने राजस्थान संघाला ६३ धावांनी मात देत दमदार विजय नोंदविला. सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट बंगालने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाèया या संघाने २० षटकांत सहा गडी गमवित १९४ धावा उभारल्या. फलंदाजीत उत्पल मुजूमदारने ४९ तर राजकुमार घोषने ३८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत उमेश सैनीने दोन गडी बाद केले.
 
प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १९.२ षटकांत सर्वगडी गमवित १३१ धावांवरच बाद झाला. फलंदाजीत सलामीवीर फलंदाज इक्बाल खान याची अर्धशतकी खेळी वगळता इतर फलंदाजांना साजेसा खेळ करण्यात अपयश आले. गोलंदाजीत जयेश परमारने तीन तर राजकुमार घोषने दोन गडी बाद केले.वसंतनगर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंजाबने ५ गडी राखून हिमाचल प्रदेश संघाला नमविले. सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाब संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला.
 
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हिमाचल प्रदेश संघाला १९.५ षटकांत सर्वगडी गमवित केवळ ११९ धावाच उभारत्या आल्या. फलंदाजीत सर्वाधिक २८ धावा हेमराज राजपुत याने केल्या. गोलंदाजीत अर्मीक सिंगने चार तर सलीम खानने दोन गडी बाद केले.११९ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलागकरण्यासाठी फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाने हे आवाहन १०.४ षटकांत पाच गडी गमवित सहजच पूर्ण केले. फलंदाजीत सर्वाधिक ५९ धावा विजय कुमारने तर ३८ धावांचे योगदान लाडू सिंगने दिले. गोलंदाजीत गुरमीत धिमनने तीन गडी बाद केले.