विजयराज शिंदे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

    दिनांक :20-Feb-2021
|
बुलडाणा,
येथील वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्न व सहकार्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माजी आ.विजयराज शिंदे यांनी त्यांच्या नागपूर निवासस्थानी 20 फेबुृवारीला सदिच्छा भेट घेतली. आगामी काळात होऊ घातलेल्या भाजपा बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण सुद्धा दिले.
 
dev_1  H x W: 0
 
यावेळी निमंत्रणाचा स्विकार करून उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन ना.फडणवीस यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटन, विकास कामे व इतरही अनेक विषयांवर ना.देवेंद्र फडणवीस व विजयराज शिंदे यांच्याशी भेटी दरम्यान चर्चा केली. यावेळी मंदार बाहेकर, दत्ता पाटिल, प्रशांत नारखेड़े यांचीही उपस्थिती होती.