आज जिल्ह्यात 215 कोरोनाबाधित

    दिनांक :20-Feb-2021
|
- तीन रूग्णांचा मृत्यू
- 101 रूग्णांना मिळाली सुटी
बुलडाणा,
जिल्ह्यातील आज आलेल्या अहवालानुसार 215 रूग्ण कोरोनाबाधित, तर 101 रूग्णांचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर 3 रूग्णांचा मृत्यू झाला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 815 अहवाल कोरोना नकारात्मक असून 215 अहवाल कोरोनाबाधित प्राप्त आले आहे. प्राप्त कोरोनाबाधित अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 156 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 456 तर रॅपिड टेस्टमधील 359 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 815 अहवाल नकारात्मक आहेत. उपचारादरम्यान सावळा ता. सि.राजा येथील 70 वर्षीय पुरूष, केळवद ता.चिखली येथील 75 वर्षीय पुरूष व गांधी नगर चिखली येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
 

coro_1  H x W:  
 
आज 101 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत 119196 अहवाल नकारात्मक प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14496 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना नकारात्मक असल्यामुळे त्यांना वैद्यकीय नियमानुसार सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 1922 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1163 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 186 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.