अमरावतीच्या प्रतिबंधीत क्षेत्रांची नावे जाहीर

    दिनांक :20-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
अमरावती, कोरोनाच्या प्रादुर्भाव शहरातल्या ज्या भागात वाढला आहे, त्या भागाला महानगर पालिकेतर्फे प्रतिबंधीत घोषीत करण्यात येत आहे(contentment zone of Amravati). शनिवारी ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
 
प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अमरावती शहरातल्या श्रीकृष्ण पेठ, सबनिस प्लॉट, महाजनपुरा, एलआयसी कॉलनी, भाजीबाजार, अनुराधा नगर, चंद्रावती नगर, द्वारका नगरातील उषा कॉलनी, साई नगर परिसरातील खंडेश्वर कॉलनी याचा समावेश आहे.
 

amravati content_1 & 
 
प्रार्थनास्थळी गर्दी टाळा
 सामूहिक प्रार्थनेच्या वेळी प्रार्थनास्थळी गर्दी होत असते. तथापि, कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता सर्वच ठिकाणी गर्दी टाळणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विविध धर्माच्या प्रतिनिधींना केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. विविध धर्माच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जमियत उलेमा ए हिंदचे हाफिज नाजिम अन्सारी, जामा मस्जिद समितीचे अध्यक्ष मोहम्मद शकिल, साईबाबा ट्रस्टचे शरद दातेराव, श्री अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, चर्चकडून फादर जोसलीन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
टाळेबंदीतल्या लग्नासाठी २० जणांना परवानगी
 जिल्ह्यात शनिवार रात्री आठ वाजतापासून सोमवार सकाळी आठपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत पूर्व नियोजित लग्न समारंभ पार पडण्यासाठी फक्त २० उपस्थितांना मुभा देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार संचारबंदीच्या काळात लग्न समारंभाचे यापूर्वीच नियोजन केलेल्यांना २० लोकांच्या उपस्थितीमध्ये समारंभ पाडता येईल. तसेच वधू-वर पक्षाला मिरवणूक काढता येणार नाही, लग्न समारंभाला परवानगी देणे आवश्यक वाटत असल्याने परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती महापालीकेमध्ये उपायुक्त तर उर्वरित ठिकाणी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.