शिवजयंतीनिमित्त समाजक्रांती परिवाराकडून हेल्मेट वाटप

    दिनांक :20-Feb-2021
|
मेहकर,
शिव जयंती तसेच समाजक्रांती परिवाराच्या वर्धापनदिनानिमित्त हेल्मेट वाटप कार्यक्रम येथील पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला. गावखेड्यातील गोरगरीब 19 कामगार तरुणांना 19 हेल्मेट मोफत वाटप करून रस्ता सुरक्षेविषयी संदेश देण्याचा प्रयत्न केला.
शहरात वेगवेगळ्या गाव खेड्यातून बरीच बेरोजगार तरुण कामगार मुलं रोजंदारीने कामासाठी येत असतात. वेगवेगळ्या हॉस्पिटल्स, दुकानं, गॅरेज वा बँकमध्ये अगदी दीड ते दोनशे रुपये रोजनदारीने ते काम करीत असतात. मात्र दररोज ये-जा करतांना हेल्मेटचा वापर फारसा दिसून येत नाही. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता, रस्ता सुरक्षा हा खूप मोठा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. अपघातात कितीतरी व्यक्ती गतप्राण झाल्याची काही दुर्दैवी उदाहरणं आहेत. तर काहींना अपंगत्व देखील आल्याचे देखील घडले आहे.त्यामुळे मोटारसायकल वरून ये-जा करतांना एक वेळेला,बूट,चप्पल घरी विसरली तरी चालेलं,मात्र हेल्मेट विसरता कामा नये अशा प्रकारच्या सूचना तरुणांना कार्यक्रमा दरम्यान दिल्या गेल्या.
 
 
helmet_1  H x W
 
कार्यक्रमाला मेहकर पोस्टे.चे ठाणेदार प्रधान यांनी दररोजच्या ये-जा करणार्‍या तरुणांनी हेल्मेट सातत्याने वापरल्यास गावातील इतर व्यक्ती देखील त्यांचं अनुकरण नक्कीच करतील. येणार्‍या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वा वेगवेगळे महत्वाचे दिवस संकल्पपूर्वक व समाजहित जोपासत साजरे करणे काळाची गरज असल्याचे यावेळी सांगितले. समाजक्रांती परिवाराने रस्ता सुरक्षा अभियान या आगळ्यावेगळ्या प्रकारे राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी समाजक्रांती परिवाराचे संस्थापक गजानन पाटोळे, परिवाराचे जेष्ठ मार्गदर्शक मंगल जैन कोठारी, रवींद्र बोरे, अरुण दळवी, रमेश ठाकरे, राजेश बोरे, गजानन पातळे, अनिल तुरूकमाणे यासह कामगार मुलं उपस्थित होती.