'असमज' : शहरातील कलावंतांची लघुपट निर्मिती

    दिनांक :21-Feb-2021
|

asamant _1  H x
 
नागपूर,
नागपुरातील कलावंतांनी श्री वक्रतुंड चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'असमज' या मराठी शॉर्टफिल्म (लघुपट) ची निर्मिती केली असून या फिल्मद्वारे रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा संदेश पालकांना देण्यात येणार आहे. काही पालक लहान मुलामुलींना वाहन देऊन त्यांचे कौतुक करतांना दिसतात. या वयात परवाना मिळत नसल्याने पोलिसांनी पकडल्यास पैसे देऊन कसे वाचायचे याचे धडे देतात आणि बिनधास्त राहतात. या दरम्यान अपघात झाल्यास निर्माण होणाऱ्या  कायदेशीर अडचणींबाबत याविषयी थेट मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लघुपटात अनिल प्रजापती, देवेंद्र वानखेडे, मृणाल मुळे, गंगाताई मेंढे, दीपक कट्यारमल, सुरज जयस्वाल, आणि राजेश दिवाण आदी कलावंताच्या भूमिका आहेत. फोटोग्राफी आणि एडिटिंगची जबाबदारी अनिल प्रजापती यांनी सांभाळली आहे. गीते राजेश दिवाण यांची असून त्यात राजेश दिवाण आणि सचिन दिवाण यांनी गायले असून कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शक राजेश दिवाण यांचे आहे. चित्रीकरण स्थळांसाठी गंगाताई मेंढे, कविता मलकवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.