देवळी ,
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या 36 तांसाच्या संचारबंदीच्या आदेशाला देवळीकरांनी काल दि.20 रोजी उस्फुर्त प्रतिसाद दिला. राज्यात परतून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा यांनी खबरदारी म्हणून 20 तारखेच्या रात्री 8 पासून जिल्ह्यामध्ये 36 तासाची संचारबंदी लागू केली होती.
यांमध्ये आवश्यक आणि मेडिकल आकस्मिक सेवा सोडून जिल्ह्यातील सर्व दुकानें, मॉल, हॉटेल-रेस्टॉरंट, चित्रपटगृह, जिम, लग्न सभागृह आणि सार्वजनिक मनोरंजनाची स्थळे यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ नियंत्रणात आणणे आणि कोरोना विषाणू संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल आवश्यक असल्याचे लक्षात ठेऊन देवळीकरांनी घरात राहून शासनाला सहकार्य केले. काल देवळी बाजारपेठ पुर्णपणे बंद होती. आणि नागरिकसुद्धा घराबाहेर पडले नाही. कृषीउत्पन्न बाजार समिती मध्ये शुकशुकाट असल्यामुळे लगतच्या गावातील शेतकरी देवळीत फिरकले नाही. पोलीस प्रशासनाची गस्त दिवसभर सुरु असल्याने जिल्हाधिकारी आदेशाची देवळीत काटेकोरपणे अंमलबजावणी झाली.