एका तासाच्या कारवाईत 5 हजारांचा दंड वसूल

    दिनांक :21-Feb-2021
|
- विनामास्क वावरणे 50 जणांना भोवले
- तिरोडा पोलिसांची अवंतीबाई चौकात कारवाई
तभा वृत्तसेवा
तिरोडा,
कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढले आहे. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे व त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. परंतु नागरिक नियम पाळताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे तिरोडा पोलिसांनी आज, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजतापर्यंत अवंतीबाई चौकात कारवाई अभियान राबविण्यात आले. यात मास्क न घातलेल्या 50 जणांकडून 5 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
gondia_1  H x W
 
कोरोना पसरू नये यासाठी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निरंतर माहिती पोलिस प्रशासन आठवडी बाजारात देत आहे. परंतु याकडे तिरोडा शहरातील नागरिक डोळेझाक करून सार्वजनिक ठिकाणी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आज 21 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 12 वाजतापर्यंत तिरोड्याच्या अवंतीबाई या मुख्य चौकामध्ये कारवाई अभियान राबविले. एका तासाच्या कारवाईत एकूण 50 नागरिक मास्क न घातलता सार्वजनिक ठिकाणी फिरताना मिळून आले. त्यांच्याकडून एकूण 5 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते, पोलिस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, नाईक पोलिस शिपाई बांते, श्रीरामे, बर्वे, पोलिस शिपाई उके, बिसेन, सवालाखे, अंबुले, रामटेके यांनी केली.
 
प्रशासनाला सहकार्य करा : पो.नि.पारधी
 
नागरिकांकडून कोरोना नियमात कोणत्याही प्रकारची हयगय झाल्यास ही मोहीम सतत सुरु राहील. विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर निघताना मास्क घालूनच घराबाहेर निघावे, सोशल डिस्टिंगचा वापर करावा, पाणी व सॅनिटायझरचा नियमीत वापर करा तसेच शासन व प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सुचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी केले आहे.