मस्कवाले एक लग्न.

    दिनांक :21-Feb-2021
|
-मंत्री मास्कमध्ये, नवदांपत्यांचे विधीही मास्क लावून
भंडारा, 
नेते त्यातल्या त्यात मंत्री म्हंटलं की नियम त्यांच्यासाठी नाहीच अशा अविर्भावात ते वावरतात. पदोपदी याचा अनुभव आपण घेतला आहे. पण याला काही अपवादही असतात. जे बरेचदा आपल्या छोट्याशा कृतीतून आदर्श घालून देतात. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनीही अशेच काहीशे केले. मुलाच्या लग्नात पूर्णवेळ मास्क घालून असलेल्या मंत्रीमहोदयांनी नव जोडप्याला सर्व विधी मास्क घालून करण्यास बाध्य केले, एवढेच नाही तर मोजक्या असलेल्या वऱ्हाडयांनाही वारंवार मास्क ची आठवण दिली जात होती. अशा ठिकाणी कोरोनाला विचारच करावा लागेल ना!
 

A wedding in Muscat._1&nb 
 
 कोरोना ला आता आम्ही राजकीय नेत्या जरा हलक्यातच घेतल आहे, असे विधान दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी एका जाहीर कार्यक्रमात करून राजकीय नेते मंडळी गुरुनाथ के नियम पाळण्याबाबत फारशी गंभीर नसल्याचे सांगून टाकले. दौरे आणि कार्यक्रमांचे वेळी राजकीय मंडळी आणि नेत्यांचा मुक्तपणे होत असलेला वावर कदमांच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. सांगताना सरकार आणि त्यांचे मंत्री नियम पाहण्याचा आग्रह धरतात. ते पाहायला न दिल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची आठवणही करून देतात. वरून दंडात्मक कारवाईची भाषाही बोलून दाखवितात. हे सांगताना बरेचदा लोकांच्या तोंडावर चा मास्क मात्र खाली उतरलेला असतो. वेळ येते तेव्हा स्वतः सर्व विसरतात.
 
परंतु राज्य सरकारातील महत्वाचे खाते सांभाळणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना नियमाचा पायंडा स्वतः पाळला. 19 रोजी त्यांच्या मुलाचे लग्न तुमसरात राहत होते. आता मंत्र्यांच्या घरचे लग्न म्हटल्यावर गर्दी अपेक्षित होती पण हा नियम नाही मंत्र्यांनी पाळला. अगदी मोजके लोक असलेल्या या लग्नात स्वतः मंत्री महोदय पूर्णवेळ तोंडाला मास्क लावून होते. तेच नाही तर नवरा-नवरीला ही सर्व विधी मास्क घालूनच पार पाडण्यास सांगितले गेले. फोटो सुद्धा मस्त लावलेले काढले. मास्क तेवढे मात्र मॅचिंग होते.
 
 मंत्री महोदय स्वतः नवदांपत्य आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मास्क घालून दिसत होते. नियम पाळणे एवढ्यावरच थांबले नाही तर लग्नात येणाऱ्या प्रत्येक वर्गाला आवर्जून मास्क लावण्याचा आग्रह मंडपात आल्यावर केला जात होता. सैनीटायझर वापरा असे सांगितले जात होते.
 
आता मंत्रीमहोदयांनी मास्क लावून सहभागी होण्याचा निर्णय घेतला म्हटल्यावर इतरांना तो लावणे भागत होते. संपूर्ण सोहळ्यात प्रत्येक जण मास्क लावलेला दिसत होता. जिथे प्रत्येक जण कोरोना विषयी एवढी काळजी घेणार असेल तिथे कोरोनालाही जाताना विचार करावा लागेल, हो ना.जे कदमांनी म्हंटले, विपरीत पण अत्यंत सकारात्मक कृती राऊतांनी केली. आता किमान त्यांचा तरी आदर्श इतरांनी ठेवावा म्हणजे पुन्हा कधी कदम साहेबांना असे काही बोलण्याची वेळ येणार नाही.