जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे ठाकरे यांचा विजय

    दिनांक :21-Feb-2021
|
- सहकारी बँकेतील संचालक पद कायम राखण्यात यश
मानोरा,
सहकार क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या व मानोरा तालुका व जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेली अकोला जिल्ह सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक भाजप समर्थित उमेदवार तथा भाजपाचे जिप सदस्य उमेश ठाकरे यांनी विजय प्राप्त केला आहे.
 
 
washim_1  H x W
 
उमेश ठाकरे यांना मतमोजणीअंती सोळा मते प्राप्त झाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तुषार इंगोले पाटील यांना बारा मते, सहकार क्षेत्रामध्ये मानोरा तालुक्यात वजन प्राप्त असलेले सुरेश गावंडे यांना केवळ सहा मतावर समाधान मानावे लागले. राकाँचे जिल्ह्यातील वजनदार नेते, माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी जिप सदस्य अरविंद इंगोले पाटील यांचे चिरंजीव तुषार इंगोले यास तर माजी आ. प्रकाश डहाके यांचे गटाकडून मानोरा तालुक्यात सहकार क्षेत्रात नामवंत असलेले सुरेश गावंडे पाटील हे अकोला जिल्हा सहकारी बँक संचालक पदाच्या निवडणूक रिंगणात होते.
 
 
जिप सदस्य उमेश पाटील यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्ष तालुका कार्यकारिणी तथा माजी आ. अनंतकुमार पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी पस सभापती भोजराज चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे बोलले जात आहे. आजच्या निवडणुक निकालामुळे सहकार क्षेत्रात तालुका आणि जिल्ह्यातील राजकीय नेत्यांपुढे धोक्याची घंटा म्हणून तालुक्यात चर्चील्या जात आहे.