ग्राम पंचायत वेडमपली अंतर्गत येते असलेल्या अर्कापली पोच मार्गाची भूमिपूजन

    दिनांक :21-Feb-2021
|
- जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन
अहेरी,
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय वेडमपली अंतर्गत येत असलेल्या अर्कापली येते जिल्हा परिषदेचे जिल्हा रस्ते निधीतून पोच मार्गसाठी ६१लाख मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
gadchiroli_1  H
 
पावसाळयात रस्ता चिखल होऊन नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व चिखलातून ये-जा करावा लागत होतो त्यामुळे रस्ता बांधकाम आवश्यक असल्याने जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता सदर रस्ता मंजूर करण्यात आली असून आज भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला. असून नागरिकांना सोईचे होईल.
 
 
सदर रस्ता भूमिपूजनाच्या वेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,वेडमपलीचे सरपंच श्री.अजय मिसाल,गोविंदगावचे उपसरपंच श्री.तिरुपती अल्यूरी,जयराम आत्राम,व्येँकटी कावरे,व गावातील नागरिक उपस्थित होते.