वडनेर भागात संचार बंदी ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.!

    दिनांक :21-Feb-2021
|
वडनेर,
काल राञी आठ वाजेपासून संचार बंदी जिल्ह्यात लागू झाली असुन कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रशासनाने जाहीर केलेल्या संचार बंदीला नागरीकामध्ये कोरोनाची भिती निर्माण झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
 
wardha _1  H x
 
आज सकाळपासून स्थानिक वडनेर गावातील तसेच पंचक्रोशीत गाव खेड्यातील छोट्या पासून मोठ्या पर्यंत व्यापारी प्रतिष्ठान पुर्णपणे बंद होते. तहसील विभागाकडून संचार बंदीचे कुठे उलघंन होणार नाही याकरीता संचार बंदीच्या सुचना वेळोवेळी देत होते. वडनेर चे ठाणेदार राजेंद्र शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पेट्रोंलीग करून संचार बंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत होते.
 
 
काही दिवसापासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढायला लागली तेव्हा प्रशासनाच्या वतीने उपाय योजना म्हणुन पून्हा कडक पणे संचारबंदी जाहीर करीत नागरिकांना सुरक्षित अंतर, मास्क, वापरने इत्यादी बाबत कडक सुचना देऊन त्या बाबतची अंमलजावणी करण्या करीता प्रशासन सुद्धा रस्त्यावर उतरले आहे. तालुक्यात ग्रामीण भागात माञ नागरिक मास्क वापरत नसून प्रशासनाकडून जनजागरण करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार २० फ्रेबुवारी रात्री ८ वाजता पासुन सोमवार पर्यंत सकाळी ८ वाजेपर्यत संचार बंदी जाहीर केल्यामुळे नागरिकांनी त्यांना प्रतिसाद देत संचार बंदीला प्रतिसाद दिला. या वेळी नेहमी दुचाकी, चारचाकी चालणाऱ्या रोडवरील गाडया त्याच प्रमाणे पायदळ चालणारे रोड बऱ्याच प्रमाणात निर्मष्णुश झाले होते.