आजनसरा येथे कडेकोट संचारबंदी

    दिनांक :21-Feb-2021
|
तभा वृतसेवा 
आजनसरा,
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाअधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात आज रविवार २१ रोजी संचारबंदी घोषित करण्यात आली असल्याने आजनसरा येथील, श्री संत भोजाजी महाराज देवस्थान परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
 
wardha _1  H x
 
पुरण पोळी स्वयंपाक दोन दिवसापूर्वी पासूनच बंद करण्यात आले आहे. आज रविवार असल्याने भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी असते. परंतु आज संचारबंदी असल्याने संपूर्ण आजनसरा नगरी सह भोजाजी महाराज मंदिर परीसरासह गावात कडेकोट संचारबंदी ठेवन्यात आली. गावातील दुकाने,हॉटेल,चहा टपरी, पान ठेले, काल रात्री आठ वाजता पासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.