कारंजा येथे संचारबंदीमुळे शुकशुकाट

    दिनांक :21-Feb-2021
|
- संचारबंदी ला उस्फुर्त प्रतिसाद
कारंजा(घाडगे),
जिल्हाअधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार शनिवार रात्री ८ वाजल्यापासून कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी घोषित करण्यात आली असून, कारंजा तालुक्यातही सर्वत्र कडेकोट संचारबंदी आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कारंजा शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

WARDHA _1  H x  
 
दुकाने,हॉटेल,चहा टपरी,पान ठेले,काल रात्री आठ वाजता पासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.लांब पल्ल्याच्या तुरळक बसेस फक्त महामार्गाने धावतांना दिसून आली.वर्धा जिल्ह्यातील बसवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.बसस्थानक बंदच असल्याने त्या परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.ऐरवी सतत गजबजलेल्या महामार्गावरही तुरळक वाहतुकीमुळे निरव शांतता पसरली होती.शहरातील रस्तेही निर्मनुस्य दिसत होते.खाजगी दवाखाने व औषधी दुकाने मात्र सुरु होती.