दुर्गा वाहिनीने केली शिव जयंती साजरी

    दिनांक :21-Feb-2021
|
रिसोड,
दुर्गा वाहिनी व मातृशक्ती रिसोडव्दारा समाज बांधवांच्या सहभागातून सार्वजनिकरित्या साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करित उत्साहात साजरा केला.
 
washim_1  H x W
 
यावेळी शिवप्रेमींनी राजांना मानाचा मुजरा करीत अभिवादन केले. येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ध्वजारोहण व जिजाऊ वंदना घेऊन वर्षा तायडे यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर दिव्या शिंदे व धनश्री देवकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका संयोजिका याज्ञसेना विनायक पवार, सहसंयोजिका भावना पंजाबराव निकम यांनी केले. यावेळी उपस्थित दुर्गा वाहिनी सेविका अंकिता पवार, देवांशी पवार, दर्शना आइतवार, शिवानी उखळकर, उपस्थित मातृशक्ती शीतल पांडे, सविता पडोळकर, रेखा पवार, शुभांगी देवकर, रुख्मिना पवार, सुरेखा देवकर, निर्मला पवार व उपस्थित पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली.