मुख्य आरोपीचे एन्काउंटर

    दिनांक :21-Feb-2021
|
-कासगंज चकमक प्रकरण 
कासगंज,
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका पोलीस शिपायाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी मोतीरामच्या शोधात पोलीस होते. आज चकमकीत मोतीराम ठार झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता. आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीची घेरांबदी केली. मात्र, मोतीरामने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी उत्तर दिले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मोतीराम गंभीर जखमी झाला. शिपाई देवेंद्र यांची कुख्यात गुंड मोतीराम याने हत्या केली होती. घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १२ पथके तयार केली होती. तसेच पाच स्पेशल टास्क फोर्स पथकेही तयार केली होती. या प्रकरणातील एक आरोपी आधीच पोलीस चकमकीत ठार झाला होता. मात्र, मुख्य आरोपी मोतीराम फरार होता.

an _1  H x W: 0
 
काय आहे प्रकरण ?
जिल्ह्यातील सिढपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीमर गावामध्ये दारु माफियांच्या कारवाया वाढत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधिकारी अशोक कुमार सिंह आणि पोलीस शिपाई देवेंद्र सिंह कारवाई करण्यास गेले होते. मात्र, पोलिसांवर दारू माफिया मोतीराम आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. पोलिसांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली होती. यात अधिकारी मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. तर, शिपाई देवेंद्र यांचा मृत्यू झाला होता.