शिवाजी महाराजांचे विचार व जिद्द प्रत्येकाने आत्मसात करावे

    दिनांक :21-Feb-2021
|
गडचिरोली,
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी नगरपरिषद येथील कार्यालयात 'गोर गरिबांचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज' यांची जयंती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

gadchiroli_1  H 
 
संपूर्ण जगात शिवरायांचे तेज असून आपल्या सगळ्याना जोडणारे शिवराय आहेत. त्यांच्याकडुन आपल्याला प्रेरणा व जिद्द मिळते,त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार व जिद्द प्रत्येकाने आत्मसात करावे' असे नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना बोलत होत्या.तसेच कोरोना या शत्रूशी लढताना मास्क हिच आपली ढाल आहे.म्हणून प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असे आवाहनही या वेळी नगराध्यक्षानी केले आहे.
 
 
कार्यक्रमाला न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाटकर, शिक्षण सभापती वर्षाताई नैताम, सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवका वैष्णवी नैताम,नगरसेवक केशव निंबोड,मुख्याधिकारी संजीव ओव्होड, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडरवार,कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, बंडू टाकसांडे,राजेश मधूमटके,गणेश नाईक, दिनकर धोटे,अविनाश वाटगुरे,सूरज चोहान,शोभा भोयर व नगरपरिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.