आणखी चौघांना अटक

    दिनांक :21-Feb-2021
|
- रिंकू शर्मा हत्याप्रकरण
नवी दिल्ली 
मंगोलपुरी भागात झालेल्या रिंकू शर्माच्या हत्येप्रकरणी आणखी ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिन मोहम्मद, दिलशान, फैयाज आणि फैजान या चौघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात आतपर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
rinku_1  H x W:
 
साक्षीदारांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील चौकशीसाठी आणखी चार जणांना अटक केली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपींची ओळख पटली असून, रिंकूवर या व्यक्ती हल्ला करीत असल्याचे दिसून आले आहे. १० फेब्रुवारीच्या रात्री, वाढदिवसाच्या कार्यक्रमात पीडित रिंकू आणि आरोपीमध्ये वाद झाला होता. ज्या वादाचे रूपांतर त्याच्या हत्येमध्ये झाले.