आजपासूनचा हजरत पिरबाबा चा उरुस कोरोनामुळे रद्द

    दिनांक :21-Feb-2021
|
- केळझरात आढळला एक कोरोना रुग्ण
तभा वृत्तसेवा
सिंदी (रे.),
गांधी जिल्ह्यात कोरोनाने मुसंडी मारल्यामुळे संचारबंदी लागू केली. केळझर येथे शनिवार 20 रोजी संध्याकाळी कोरोनाचा रुग्ण आढळला. कठोर संचारबंदीच्या निर्णयामुळे केळझरच्या टेकडीवर आयोजित हजरत पिरबाबचा उरुस रद्द करण्यात आला, अशी माहिती डॉ. इर्शाद शेख यांनी दिली आहे.

wardha_1  H x W 
 
मागील दोन दशकापासून केळझरच्या टेकडीवर असलेल्या हजरत पिरबाबच्या समाधीवर 23 फेब्रुवारीला बाबाचा उरुस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या वाढत असून परिसरातील सर्व धर्मीय व पंथीय भाविक या दर्ग्यावर आदरांजली वाहतात. परंतु, यंदा कोरोनाच्या महामारीने उग्ररूप धारण केले आहे. वर्धा जिल्ह्याची रुग्ण संख्या सर्वाधिक असल्यामुळे जनसामान्यांचे हित व आरोग्य जोपासण्यासाठी मंगळवारी होणारा उरुस (यात्रा) रद्द करण्यात आली, अशी माहिती हजरत पिरबाबा उरुस कमिटीचे अध्यक्ष डॉ. इर्शाद शेख यांनी दिली आहे.