मेस्सी-नेयमार चॅम्पियन्स लीगमध्ये लढत

    दिनांक :21-Feb-2021
|

messi_1  H x W:
 
पॅरिस,
स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि तुल्यबळ नेमार या दोन फुटबॉलपटूंमधील रोमहर्षक लढत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होत आहे. यात बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेन एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. नेमारच्या सेंट-जर्मेनला गेल्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे यंदा ते जेतेपदासाठी अधिक तयारी करत आहेत.दुसरीकडे मेस्सी संपूर्ण लयीत असल्याने बार्सिलोनाचा आत्मविश्‍वास बळावला आहे. गतवर्षी बायर्न म्युनिकने बार्सिलोनाचा 8-2 असा धुव्वा उडवून त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आणले होते. बार्सिलोना आणि सेंट जर्मेन यांच्याव्यतिरिक्त 2019 सालचा विजेता लिव्हरपूल व आर. बी. लेपझिग यांच्यातही याच दिवशी सामना होणार आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला अन्य आठ संघांच्या उपउपांत्यपूर्व लढती खेळवण्यात येणार आहेत.