नवे 6 बाधित, 1 रुग्णांचा मृत्यू

    दिनांक :21-Feb-2021
|
- 6 रुग्णांची कोरोनावर मात
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 21 फेब्रुवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळूले तर 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर एका रुग्णाचा गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
gondia_1  H x W
 
आजपर्यंत 14,325 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून 14085 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. आता क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 55 असून 30 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 185 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे. जिल्ह्यात आज गोंदिया तालुक्यात 5 व अन्य जिल्ह्यातील बाधित रुग्ण आढळला असून गोंदिया तालुक्यातील 6 कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत 68988 चाचण्या करण्यात आल्या. पैकी असून यात 57252 चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला तर 8457 चाचण्यांचा अहवाल सकारात्मक आला. आता 52 चाचण्यांचा अहवाल प्रलंबित आहेत. तसेच 67654 प्रतिजन चाचण्यांपैकी 61493 चाचण्या नकारात्मक आल्या. तर 6161 चाचण्यांचा अहवाल सकारात्मक आला.