मराठी हिंदी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

    दिनांक :21-Feb-2021
|
नागपूर, 
रजनीगंधातर्फे आयोजित मराठी हिंदी गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरूवात सूर तेच छेडिता गीत उमटले नवे या गाण्याने झाले हे गीत एम.व्ही पारधे यांनी सादर केले. त्यानंतर पारधे यांनी किसी पत्थर की मुरत से, तुम्हारा चाहनेवाला खुदा की ही गाणी सादर केली. अतिथी गायक म्हणून आलेल्या शिवराज यांनी दिल को देखो, चेहरा ना देखो, प्यार -प्यार चाहिए थोडा प्यार ही गाणी सादर करत रसिकांची वाहवा मिळवली. शिवराज आणि जया धाबेकर यांनी करवटे बदलते रहे हे युगल गीत सादर केले, त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. गायत्री खेडकर यांनी गगन सदन तेजोमय, सुनो सजना पपी हे ने, तु जहा जहा चलेगा, चंदन सा बदन ही गाणी सादर केली. कार्यक्रमाची सहसंयोजक धनश्री भगत यांनी तेरी निगाह ने दिल को, रोज शाम आती मगर ही गाणी सादर करत आपल्या आवाजाची मोहीनी रसिकांवर टाकली. 

rajani _1  H x
 
धनश्री भगत आणि प्रशांत मानकर यांनी वादा रहा सनम हे युगल गीत सादर करत रसिकांना अक्षरक्षः त्या काळात नेले. संतोष लिखार यांनी अरे ओ शोख कलीयो, कसमे वादे प्यार वफा, मेरी दुनिया है तुझमें, तुम को पाया है तो जैसे ही गाणी सादर केली. तुम अगर साथ देने का, कांची रे कांची रे ही गाणी प्रवीण अडूळकर आणि परिणीता मातूरकर यांनी सादर केली. तर मृणाल ताम्हण यांनी पान खायो सय्या हमारो, जरा जरा मेहेकता है ही गाणी सादर केली. जया धाबेकर आणि विवेक कुन्नावार यांनी तेरे चेहरे से नजर नही हटती आणि विवेक कुन्नावार यांनी जब जी ना लगे, ये दिल ना होता बिचारा, तेरे जैसा यार कहा ही गाणी सादर करत प्रेक्षांना खिळवून ठेवले. प्रशांत मानकर यांनी शोधिसी मानवा राउळी मंदिरी हे गाणे सादर केले. कार्यक्रमाचे संगीत नियोजन मंगेश पटले यांनी केले.