अमरावतीत साप्ताहिक टाळेबंदीला प्रतिसाद

    दिनांक :21-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घोषित केलेली साप्ताहिक टाळेबंदीला नागरिकांनी रविवारी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शनिवारी रात्री सुरू झालेली टाळेबंदी सोमवार सकाळपर्यंत राहणार आहे.
 
amravati_1  H x
 
औषधी दुकाने, रुग्णालये वगळता सर्व सेवा बंद आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत फक्त डेअरी सुरू होत्या. त्यामुळे काही लोक दूध, दही घेण्यासाठी बाहेर पडताना दिसले. त्यानंतर मात्र नागरिक बाहेर दिसले नाही. काही उत्साही फिरताना आढळले त्यांना पोलिसांनी समज दिली. अमरावती शहर व तालुका स्थानावरील शहरामध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. पोलिसांची गस्त सुरूच होती. मोक्याच्या स्थानावर पोलिसांचा बंदोबस्तही होता. एसटी बस व अन्य खाजगी वाहतूक बंद होती.