कोरोना बाधीतांची वाढती संख्या चिंताजनक : आ श्वेता महाले

    दिनांक :21-Feb-2021
|
चिखली,
जिल्हयात कोरोना विक्राळ रूप घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . आजची कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही 300 एव्हढी झाली असून वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक असल्याचे प्रतिपादन आ. श्वेता महाले यांनी कोरोनाचा वाढता प्रसार बघता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आलेल्या अधिकारी व नागरिकांच्या बैठकीत केले आहे.
 
buldhana_1  H x
 
जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली असून वाढणार्‍या बाधीत रुग्णांमुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे आ. श्वेता महाले यांनी तातडीने बैठक बोलावून कोरोना प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये पंस सभापती सिंधुताई तायडे , उपसभापती सौ शमशाद बी पटेल,सतीश गुप्त, पंडित देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ , कुणाल बोन्द्रे, , सुधीर चेके पाटील , तहसीलदार डॉ अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस , ठाणेदार गुलाबराव वाघ , आरोग्य अधिकारी डॉ खान , सुरेखा गवई ,शिवराज पाटिल , अतरोद्दीन काझी , रवी तोडकर , दिपक खरात,श्रीराम झोरे शिवसेना शहर प्रमुख, विनायक सरनाईक , नितीन राजपूत, गोपाल आप्पा शेटे, राकेश चोपडा , मुन्ना बैरागी अनेक नागरिक, व्यापारी व अधिकारी उपस्थित होते .
 
 
यामध्ये सर्व नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , मंडप डेकोरेशन मंगल कार्यालय यांनी कुठल्याही कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होऊ देऊ नये , सर्व बँकांनी , व्यापार्‍यांनी आपापल्या संस्थांमध्ये मास्क व सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करावी , बँकेतील कर्मचारी व सर्व व्यापारी तसेच जनतेच्या संपर्कात येणार्या लोकांनी दर पंधरा दिवसांनी स्वतः तपासणी करावी , बाजारपेठांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी पोलिस व नगरपरिषद यांची पथके नेमुन सोशल डिस्टंसिंग बाबत जनतेस प्रवृत्त करावे , मास्क न घालणार्‍या व्यक्तीवर दंड लावण्यात यावा , भाजीपाला विक्रेते दुकानदार यांनी स्वतः मास्क वापरुन ग्राहकांशी मास्क शिवाय व्यवहार करू नये , कुठल्याही कोविड पॉझिटिव रुग्णास घरी ठेवू नये , खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी कोविड सदृश्य रुग्णांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवावे , जनतेने जबाबदारी घेत मास्क , सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन करावे लक्षणे दिसताच क्षणी तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.