भंगाराच्या गोडाऊनला आग

    दिनांक :21-Feb-2021
|
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवाजी मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भंगार गोदामाला आज रविवार २१ रोजी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली.आग लागलेले गोडावून हे शहरातील उद्योजक अरुण हुरकट यांचे असल्याची माहिती असून, या अचानक लागलेल्याआगीने रौद्ररूप धारण केले आहे.
 
wardha _1  H x
 
आगीत गोडाऊनमध्ये वेस्ट मटेरियल,पन्नी,खर्ड्याचे कोन,नादुरुस्त झालेल्या मशीनरी साहित्य आगीने भस्मसात झाले आहे.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरीषदेचे अग्नीशमन पथक प्रयत्न करीत आहे. मात्र सदर वृत लिहिपर्यंत आग आटोक्यात आल्याचे दिसुन येत नाही. आग विजेच्या शार्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.