सौदी अरेबियात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

    दिनांक :21-Feb-2021
|
रियाध,
हिमवृष्टीमुळे सौदी अरेबियाचे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागातील तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहचले. जवळपास ५० वर्षानंतर अशाप्रकारची हिमवृष्टी झाली असल्याचे म्हटले जाते. हवामान खात्याने येत्या काही दिवसात रात्रीच्या वेळी तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
 
 
sa_1  H x W: 0
 
 
एक आठवड्यापूर्वीच आखाती देशांमध्ये थंडी सुरू झाली आहे. रात्री वाहणाऱ्या थंड हवेमुळे काही भागातील तापमान शून्य अंशाखाली गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सौदीतील नागरिकांना सकाळी उष्ण आणि रात्री थंड वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.
 
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशातील काही भागांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकते. अशातच लोकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना थंडीपासून बचाव करण्याची आवश्यकता वर्तविली आहे. सौदी अरेबियाच्या असीर भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे.