विधार्थ्यीना मेट्रो प्रवासासाठी प्रोत्साहित करणार

    दिनांक :21-Feb-2021
|
नागपूर, 
खासगी वाहनांच्या ऐवजी मेट्रो रेल्वे सेवा वापरण्यासाठी महा मेट्रोचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत आणि त्यास यशही येत आहेत. अनेक संस्था आणि व्यक्तींनी त्यांच्या वैयक्तिक वाहनांचा वापर बंद करून मेट्रो सेवा वापरण्यास सुरूवात केली आहे. या सेवेचा अनुभव घेतल्यानंतर झांसी राणी मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या सेवा सदन शाळेच्या समस्त चमूने समाधान व्यक्त केले असून बसचा वापर कमी करत त्याऐवजी विद्याथ्र्यांना मेट्रो ट्रेनने प्रवास करण्यास प्रोत्साहित करतील. शाळेच्या आवारात नुकत्याच झालेल्या पालक-शिक्षकांच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या  विद्याथ्र्यांचे पालक या बैठकीस उपस्थित होते. सेवा सदन शिक्षण संस्थेच्या प्राचार्य आणि झांसी राणी चौक मेट्रो स्टेशनच्या राजदूत साधना हिंगवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला बèयाच पालकांनी हजेरी लावली.
 
metro _1  H x W
 
बैठकीस आलेल्या महा मेट्रो अधिकाऱ्यांनी महाकार्ड, मेट्रो सव्र्हिसेस आणि एण्ड टू एण्ड कनेक्टिव्हिटी विषयी सविस्तर माहिती देऊन पालकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. मेट्रो सेवा, जसे स्टेशन, रेल्वेचे वेळापत्रक आणि इतर माहिती सेवा सदन शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशीही शेअर केली गेली. विद्याथ्र्यांच्या पालकांनी आश्वासन दिले की त्यांचे पाल्य नागपूर मेट्रोने प्रवास करतील आणि वैयक्तिक किंवा  खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी प्रमाणात करतील. सेवादान स्कूल व्यवस्थापनानेही खासगी बससेवा बंद करण्याची घोषणा केली आणि त्याऐवजी मेट्रो ट्रेन सेवांचा व्यापक वापर आणि फीडर सेवेद्वारे शेवटच्या मैलांपर्यंत महा मेट्रो सेवेचा वापर करण्याचे आवाहन विद्याथ्र्यांना केले. मेट्रो वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि पालकांच्या सुविधेसाठी शाळेच्या आवारात महा कार्डचा स्टॉल लावण्यात आला होता. महा-कार्ड विक्रीला विद्याथ्र्यांच्या पालकांनी व शाळेतील कर्मचाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.