तूर्तास टाळेबंदी नाही - जिल्हाधिकार्‍यांची स्पष्टोक्ती

    दिनांक :21-Feb-2021
|
नागपूर, 
बंदमुळे आर्थिक फटका बसू शकतो. यापूर्वी आपण अर्थचक‘ बंद झाल्यानंतर सगळेच अडचणींना सामोरे गेलो आहोत. त्याचा अधिक फटका समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सकारात्मकरीत्या प्रतिसाद द्यावा. तसेच यावेळी तूर्तास लॉकडाऊन लावणार नसल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांनी कोरोना सारखे लक्षण असतील तर मोफत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा कॉलेजेसमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करणे मु‘याध्यापक, प्राचार्य यांची जबाबदारी असेल. शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करून घेतले पाहिजे.आणि लक्षणे असतील तर त्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश देऊ नये. जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला सर्वतोपरी सहाय्य करावे ,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
  

ngp_1  H x W: 0 
 
 
तालुका स्तरांवर सभा
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही वाढत्या संकटामुळे आता प्रत्येक मोठ्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना काटेकोरपणे करण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याठिकाणी उपविभागीय अधिकार्‍यांसह सर्व अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद सदस्य, तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. 22 तारखेला नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, नागपूर ग्रामीण याठिकाणी तर 23 ला हिंगणा, कामठी, मौदा, कुही या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. सहवासितांचा शोध मोहिमेचे नियोजन, तपासणी सं‘या वाढविणे, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्पेडर तपासणी व मृत्यू संदर्भातील अन्वेषण करण्याबाबत या बैठकांमध्ये निर्देश दिले जाणार आहे.
 
 
 
शाळा भेटीसाठी पालक अधिकारी
कोविड प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये कोरोना प्रोटोकॉल पाळला जातो, अथवा नाही यासाठी 22 तारखेपासून शाळांचे निरीक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेच्या तपासणीकरिता पालक अधिकार्‍याची नेमणूक जिल्हाधिकार्यांशनी केली असून 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजपर्यंत या पालक अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला आपला अहवाल सादर करायचा आहे.
 
 
 
शाळा कॉलेजसाठीही निर्देश जारी
जिल्ह्यात नुकतेच शाळा कॉलेज सुरू झाले असून या ठिकाणी कोविड प्रोटोकॉल नुसार सूचनांचे पालन होते, अथवा नाही याची खातरजमा करण्याबाबतही जिल्हाधिकारी निर्देशीत केले आहे. शाळेत विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास शाळा महाविद्यालय दहा दिवसांसाठी बंद ठेवावीत. संपूर्ण इमारत वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात. याबाबत संबंधित तहसील कार्यालय,नियंत्रण कक्ष, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, यांना कळवावे. संबंधित विद्यार्थ्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल गन द्वारा विद्यार्थ्यांचे तापमान घेण्यात यावे, आदी सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत.