अकोला मनपासह ह्या नगरपालिका हद्द ठरल्या 'प्रतिबंधित क्षेत्र'

    दिनांक :21-Feb-2021
|
- जीवनाश्यक वस्तुंची दूकाने सकाळी 8 ते दू.3 पर्यंत राहतील सुरू.
अकोला,
अकोला महापालिका संपुर्ण क्षेत्र व मुर्तिजापूर व अकोट नगरपालिका क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे आता या तिन्ही क्षेत्रात केवळ जीवनाश्यक वस्तुंची दूकाने हे सकाळी 8 ते दू.3 पर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक स्थळे हे 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत बंद राहतील.
 
akola_1  H x W:
 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अकोला जिल्ह्यातील अकोला महापालिका व अकोट व मुर्तिजापूर नगरपालिका या क्षेत्रांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रात ठोक भाजी विक्री ही पहाटे तीन ते सकाळी 6 पर्यंत करायची आहे. सर्व प्रकारची जीवनाश्यक दूकाने, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने हे सकाळी 8 ते दू.3 पर्यंत सुरु राहतील. बिगर जीवनाश्यक दुकाने व आस्थापना बंद राहतील. सर्व शासकीय कार्यालये आणि बँका सुरु राहतील. सर्व प्रकारची उपहार गृहे व हॉटेल्स फक्त पार्सल सुविधा देऊ शकतील. वधु व वरांसह लग्नात केवळ 25 वर्‍हाडी तहसीलदारांच्या परवानगी उपस्थित राहू शकतील. मालवाहतुक सुरु राहील. सर्व प्रकारची खाजगी व सार्वजनिक वाहतुक पोलीस निरीक्षकांच्या परवानगीने सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत होणार नाही. असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे.