नवीनतम तंत्रज्ञानाद्वरे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करा

    दिनांक :21-Feb-2021
|
- नितीन गडकरी यांचे आवाहन
- कृषी कल्याण यू ट्यूब चॅनेल चे लोकार्पण
नागपूर,
बदलत्या जागतिकीकरणाकडे लक्ष केंद्रीत करून तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करावा आणि देशातील शेती आणि शेतकरी कशा पद्धतीने सक्षम होईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नवीनतम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकèयांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.कृषी कल्याण या यू ट्यूब चॅनेल चे लोकार्पण  नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
 
kru _1  H x W:
 
नितीन गडकरी पुढे म्हणाले, की स्मार्ट सिटी प्रमाणे गावं स्मार्ट झाली पाहिजे. केंद्र सरकारने आणलेल्या दिशा या योजनेची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहचवा आणि गावातील मुलभूत गरजा पूर्ण कशा होतील यादृष्टीने प्रयत्न करा राजकारणे मिडिया वेव्हज ने कृषी विकास साधण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांबद्दल अजय राजकारणे यांचे यावेळी गडकरींनी कौतुक केले. कृषी कल्याणचे संपादक नितीन कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार रामदास आंबटकर, मानस उद्योग समूहाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, अनिल जोशी, भोजराम कपगते, संचालक सारंग गडकरी, समय बनसोड, माफसू चे सदस्य सुधीर दिवे आदींची उपस्थित होते.