शहरातील दोन मंगल कार्यालयास प्रत्येकी 10 हजार रुपयाचा दंड रिसोड,

    दिनांक :21-Feb-2021
|
रिसोड,
वाढत्या कोरोणाच्या धर्तीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लादले असताना शहरातील 2 मंगल कार्यालयात परवानगी पेक्षा ज्यास्त व्यक्ती आढळून आल्याने दोन मंगल कार्यालयास नपने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकारला आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगल कार्यालयास आकारण्यात आलेला हा पहिलाच प्रसंग.
 
WASHIM_1  H x W
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन जागे झाले असून, विना मास्क असणार्‍या व्यक्तींवरही दंड आकारणे सुरू केले आहे. तसेच भरारी पथक नेमुन स्थानिक सर्व मंगल कार्यालयाची तपासणी केली असता आज, 21 फेब्रुवारी रोजी येथील 2 मंगल कार्यालयामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्या. त्यामुळे नगरपालिकेने धडक कारवाई अंतर्गत दोन्ही मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची पावती दिली. या घटनेमुळे मंगल कार्यालय व्यवस्थापनेचे धाबे दणाणले असून, लग्न किंवा इतर कार्यक्रम करणार्‍यांना सुद्धा यामुळे चाप बसणार आहे. कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. सदर कारवाई नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी पार पाडली.