मोटेराच्या स्टेडियममध्ये दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार

    दिनांक :21-Feb-2021
|
अहमदाबाद,
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना, 24 फेब्रुवारीपासून  खेळला जाणार आहे. दुसर्‍या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना हे समजले असावे की फिरकीच्या सहाय्याने भारतीय खेळपट्ट्यांवर धावा करणे इतके सोपे नाही. तर भारतीय संघाला घरगुती मैदानांवरील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.
 
krida_1  H x W:
 
खेळपट्टीबाबत पाहुण्या संघास कोणत्याही प्रकारची तयारी करुन द्यायची नाही. यामुळेच इंग्लंडला गोंधळात ठेवण्यासाठी मोटेराच्या स्टेडियममध्ये दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीप्रमाणेच येथेही बॉल फिरेल, खेळपट्टीवर किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे.
 
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरली जाणारी खेळपट्टी सामन्याच्या 48 तास आधी आयसीसी मॅच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. खेळपट्टीबाबत इंग्लंड संघाचा संशय कायम ठेवावा अशी भारताची इच्छा आहे, आणि खेळपट्टी आयसीसीच्या अधिकाऱ्यांकडे देण्यापूर्वी ती कशी आहे, हे उघड होऊ नये ही भारतीय संघाची इच्छा आहे. यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला इंग्लंडला प्लेईंग इलेव्हनची निवड करणे अवघड झाल्याचे सिद्ध होत आहे.