शाहीनबागेतील पीएफआयच्या कार्यालयावर छापे

    दिनांक :21-Feb-2021
|
- उत्तरप्रदेश विशेष कृतिदलाची कारवाई
 
नवी दिल्ली, 
उत्तरप्रदेश विशेष कृतिदलाच्या (एसटीएफ) पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) शाहीनबाग स्थित कार्यालयावर रविवारी छापेमारी केली. रऊफ शरीफची चौकशी केल्यानंतर उत्तरप्रदेश विशेष कृती दलाच्या चमूने पीएफआयच्या दिल्लीतील कार्यालयावर छापे मारले. याशिवाय पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरूच आहे.
 
 
stf_1  H x W: 0
 
उत्तरप्रदेश एसटीएफच्या चमूने पीएफआय विद्यार्थी विभागाच्या रऊफ शरीफला केरळहून अटक वॉरंटवर आणले. केंद्राच्या नवीन नागरिकत्व कायद्याविरुद्ध हाथरस येथे दंगल झाली होती. ही दंगल भडकविण्यात रऊफचा हात असल्याचा आरोप आहे. पीएफआयच्या माध्यमातून त्याने दंगली भडकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. या पृष्ठभूमीवर उत्तरप्रदेश विशेष कृतिदलाच्या पथकाने आज दिल्लीतील शाहीनबाग स्थित पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी केली.
 
 
उत्तरप्रदेश विशेष कृतिदलाच्या पथकाने रऊफ शरीफला केरळमधून अटक केली होती. तो पीएफआय विद्यार्थी विभागाचा सरचिटणीस आहे. मथुरा येथे जात असताना पीएफआयच्या चार सदस्यांना अटक झाली होती. त्यांची सखोल चौकशी केल्यावर हाथरस येथील दंगलीचे कारस्थान उघडकीस आले होते.