नायजेरियामध्ये वायू सेनेच्या विमानाचा स्फोट

    दिनांक :22-Feb-2021
|
- सात जणांचा दुर्दैवी मृत्यू
अबुजा,
नायजेरियामध्ये वायू सेनेच्या एका विमानाला हवेतच अपघात झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत नायजेरियाच्या वायू सेनेचे प्रवक्ते इबीकुनले दारामोला यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. 'किंग एअर 350' विमानाने राजधानी अबुजा येथील विमानतळावरुन उड्डाण घेतले. तेव्हाच विमानाच्या इंजिनमध्ये गडबड असल्याचे लक्षात आले आणि विमानाने परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपघातग्रस्त झाला. दुर्दैवाने या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला आहे', असे ट्वीट इबीकुनले दारामोला यांनी केले आहे.
 
crash _1  H x W
 
या दुर्दैवी अपघाताचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्यामते, असा भयानक अपघात गेल्या बऱ्यात काळापासून घडलेला नाही. विमानतळावर गेल्या नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने, हा अपघात पाहून सर्वच घाबरले होते. लोक मोठ-मोठ्याने ओरडत होते. गेल्या दशकापासून आम्ही इतकं भयावह दृष्य पाहिलेला नसल्याचे म्हटले आहे. घटनास्थळाच्या फोटोंमध्ये अपघातग्रस्त विमानातून धूर निघताना दिसतो आहे.  विमान वाहतूक मंत्री हादी सिरिका यांनी ट्वीट केले की, हा अपघात अत्यंत घातक असल्याचे दिसत आहे. त्यांनी म्हटलं की, सेना प्रकरणाचा तपास करत आहेत. विमान अबूजाच्या उत्तर-पश्चिमेकडे जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मिन्ना शहरात जात होता. प्रत्यक्षदर्शिंच्यामते हा अपघात अत्यंत भयानक होता.