मंत्रालयात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव

    दिनांक :22-Feb-2021
|
मुंबई,
मुंबई मंत्रालयाच्या महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागातील २२ कर्मचारी आज एकाच दिवशी गैरहजर असल्यामुळे ही बाब लक्षात आली आहे.
 
 

mm_1  H x W: 0  
 
याबाबत महसूल विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने, हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आलेले नाही. चौकशी केल्यावर कळले कि,  २२ पैकी आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
यामुळे मंत्रालयाच्या महसूल कर्मचाऱ्याचा कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची लक्षणे स्पष्ट दिसत आहे. मंत्रालयातील एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने या विभागाचे काम कसे होणार असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.