अमेरिकेत कोरोनाबाधितांचा मृत्यूदर २० टक्के

    दिनांक :22-Feb-2021
|
वॉशिंग्टन,
जगभऱ्यात कोरोनामुळे झालेल्या एकंदरीत मृत्यूंपैकी जवळपास २० टक्के मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ८७ लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
 
 
cc_1  H x W: 0
 
 
जगभरातील करोनाबाधितांची संख्या ११ कोटी १९ लाख ५३ हजार ३८८ इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी २४ लाख ७७ हजार ८५० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी म्हणाले, हा अतिशय वेगळ्या प्रकारचा साथीचा आजार आहे. १०२ वर्षांपूर्वी म्हणजे १९१८ मध्ये आलेल्या इन्फ्लूएंझा महारोगानंतर आलेली हि सर्वात मोठी साथ आहे. अमेरिकेत सप्टेंबर २०२० मध्ये दोन लाख आणि डिसेंबर २०२० मध्ये तीन लाखांवर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा पोहचला. त्यानंतर एक महिनाभरात आणखी एक लाख मृतांची नोंद करण्यात आली.