जोकोव्हिचने जेतेपदावर नाव कोरले

    दिनांक :22-Feb-2021
|
मेलबर्न,
नऊवेळा अंतिम फेरीत धडक मारणार्‍या जोकोव्हिचने  या स्पर्धेमध्ये एकदाही हार पत्करली नाही. अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचने डॅनिल मेदवेदेवचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले आहे. जोकोव्हिच याने मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकाने पराभव केला. चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. 
33 वर्षीय जोकोव्हिचने गेल्या दहापैकी सहा मोठ्या स्पर्धांची विजेतीपदे मिळवली आहेत. या विजेतेपदामुळे जोकोव्हिचने आपले अव्वल स्थान आणखी बळकट केले आहे.
 
joco _1  H x W: 
 
तो सलग 311 आठवडे अव्वलस्थानी राहील. चतुर्थ मानांकित मेदवेदेव याने दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळली; पण याही वेळेस त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2019 मध्ये अमेरिकन ओपनचा तो उपविजेता ठरला होता. त्यावेळी नदालने त्याला हरवले होते. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. आता पुन्हा एकदा त्याला ऑस्टेलियन जेतेपदाने हुलकावणी दिली. तर, जोकोव्हिचने नववे ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवले आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (2005) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.