शासकीय कार्यालयातून कोरोना होत नाही कां

    दिनांक :22-Feb-2021
|
-नियम फक्त सामान्यांसाठीच
-प्रमाणपत्रांसाठी अतोनात गर्दी
-सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन
नागपूर, 
नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची ओरड सातत्याने शासकीय आणि मनपा स्तरातून होत आहेत. आणि दररोज केवळ सामान्य नागरिकांसाठीच नवेनवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. लग्नसमारंभ, मंदिरे, हॉटेल्स, मॉल, आठवडी बाजार, दैनिक बाजारपेठा बंद करण्यात आल्या. या पाश्र्वभूमीवर आज शासकीय कार्यालयांचा फेरफटका मारला असता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील प्रमाणपत्र वितरण केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी होती, रांगा होत्या, कुठेही नियमांचे पालन होत नसल्याचे दिसले आणि मुख्य म्हणजे गर्दीच्या नियंत्रणासाठी त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून आले. एकूणच कोरोनाच्या नावाखाली सामान्यांची गळचेपी करुन शासनाला ज्याठिकाणी उत्पन्न मिळते अशी सर्व कार्यालये तुडुंब गर्दीसह वाहत आहेत.
 

pjo_1  H x W: 0 
 
कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त करीत आजवर मंगलकार्यालयांमध्ये असलेली क्षमतेची मर्यादा संपुष्टात आणून सरसकट मंगलकार्यालये आणि लॉन बंद करण्यात आली. दुसरीकडे शासकीय कार्यालये मात्र गर्दीसह ओसंडून वहात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केल्यापासून कुठेही कोरोना प्रतिबंधांचा लवलेश जाणवत नाही. प्रमाणपत्रांसाठी आलेल्या सामान्य नागरिकांच्या रांगा, वकिल, नोटरी, दलालांची गर्दी, सायकल स्टॅन्डवर वाहन ठेवण्यासाठी जागा नाही. कार्यालयासमोर असलेली झेरॉक्स, फोटो कॉपी काढून देणाèयांची दुकाने, चहा-नाश्तावाल्यांच्या टपèया सराईतपणे सुरू होत्या. संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दी होती, कार्यालयांच्या मुख्य द्वारापासून आत जाण्यासाठी देखील जागा नाही अशी स्थिती, याठिकाणी प्रमाणपत्रांसाठी येणाèयांकडेच फक्त मुखाच्छादन होते. सरकारी कर्मचारी, टायqपग मशीनवाले, मुद्रांक विक्रेते, नोटरी आदींकडे मुखाच्छादन नव्हते, ज्यांच्याकडे होते त्यांनी फक्त औपचारिकता म्हणून लावले होते. सॅनिटायझर कुठेही दिसत नव्हते, गर्दी प्रचंड असल्यामुळे भौतिक दूरतेचा तर फज्जाच उडालेला होता.
 
शासनाच्या कोणत्याही भूमिका आणि निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाधिकाèयांकडे असते आणि तेच या नियंत्रण अभियानाचे प्रमुख आहेत, शिवाय तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी अधिनस्थ अधिकाèयांची कार्यालये याचठिकाणी आहेत. प्रमाणपत्रांसाठी खिडक्यांवर असलेल्या रांगा आणि परिसरातील संख्या यांना दिसत नाही हा खरा प्रश्न यावेळी निर्माण होतो.
फौजी रक्षक कुठे आहेत
शासकीय कार्यालयातील गर्दी पाहता नियंत्रणासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत कां, याचा शोध घेतला असता, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय मिळून एकूण पाच माजी सैनिक फौजी रक्षक म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती मिळाली, पण गणवेशातील हे फौजी रक्षक कुठेही दिसले नाहीत. अशी स्थिती असताना जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांची तैनाती कां करण्यात येत नाही हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. यासंदर्भात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, या मुद्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
विरोधाभासात्मक स्थिती
पाच दिवसांपूर्वी लग्नसमारंभासाठी उपस्थितांची मर्यादा दिली होती व त्यानुसार मंगल कार्यालयात लग्न समारंभ, पार्टी आयोजित करण्यात आली पण आज सकाळी अचानक नवा आदेश आल्याने अनेक समारंभ रद्द करावे लागले, दोन्ही बाजूच्या कुटुंबियांचा हिरमोड झाला, अनेकांना प्रचंड मनस्तापास सामोरे जावे लागले. आगामी काळात होणाèया लग्नांची देखील हीच स्थिती होईल. मात्र शहरातील हॉटेल्समध्ये मात्र लग्न समारंभ होत आहेत. वराती, मिरवणुका काढण्यात येत आहे. एकाच हेतूने काढलेल्या आदेशांचा असा आपल्यापरीने अर्थ लावण्याचा प्रकार सुरू आहे.