नवी दिल्ली,
नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीला स्थगिती देत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी तथा इतर काही मंडळींना न्यायालयीन नोटीस बजावली आहे. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ‘यंग इंडिया’ यांच्या कडून 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.