कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

    दिनांक :22-Feb-2021
|
- मुलाच्या मृत्यूमुळे होते तणावात
सीकर,
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कुटुंबाने मुलाचा मृत्यूमुळे आलेला नैराश्यातुन माहेर पडण्यासाठी सामूहिक आत्महत्या केली. यात पतीपत्नीनी आणि त्यांचा दोन मुलींचा समावेश आहे. .पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट आढळली आहे. त्यात आपला मुलगा अमर याच्या मृत्यूच्या दुःखाने आत्महत्या करत असल्याचे कुटुंबप्रमुख हनुमान प्रसाद सैनी यांनी लिहिले आहे. सामुहिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये हनुमान प्रसाद सैनी, त्यांची पत्नी तारा आणि अनु व पूजा या दोन मुलींचा समावेश आहे. या चौघांनी गळफास घेत सामुहिक आत्महत्या केली आहे. 

atmahatya _1  H
माझा मुलगा अमर याचा 27 सप्टेंबर 2020 रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशिवाय जगणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही चौघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरच आमच्यासाठी सर्वकाही होता, तोच नाही तर आम्ही आता जगून काय करणार' असे सैनी यांची चिठ्ठीत म्हटले आहे. गळफास घेण्यासाठी त्यांच्या घरात लोंखडी रॉड नव्हता. चार दिवसांपूर्वीच त्यांनी तो बनवून घेतला होता. तसेच आत्महत्येसाठी वापरलेली रस्सीही नवी होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सामुहिक आत्महत्या करण्याचा या कुटुंबीयांचा निर्णय आधीच झाला होता, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.