इस्रायलमध्ये सर्वाधिक लसीकरण

    दिनांक :22-Feb-2021
|
जेरुसलेम,
इस्रायलमधील निम्म्या लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस इस्रायलमध्ये लसीकरणासाठी वापरली जात आहे. ही लस प्रभावी ठरली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगभरात ज्या वेगाने सध्या लसीकरण सुरू आहे, त्या वेगाने लसीकरण होत राहिल्यास जगातील देशांना आपल्या ७५ टक्के लोकसंख्येला लस देण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या एकूण ७५ टक्के जणांना लस टोचल्यास हर्ड इम्युनिटी विकसित होण्याची शक्यता असते. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याचे प्रयत्न संपूर्ण जगभरात सुरू असताना इस्रायलने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. 
 
 
 
ISRA_1  H x W:
 
इस्रायलमध्ये २० डिसेंबर २०२० पासून लसीकरण सुरू करण्यात आले. इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही लस ८९.४ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयासोबत फायजरने प्राथमिक विश्लेषण केले होते. काही वैज्ञानिकांनी या लसीवर प्रश्न उपस्थित केले होते. जगभरात सर्वाधिक लसीकरण इस्रायलमध्ये झाले आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फायजरच्या लसीमुळे कोरोनाचा मृत्यूदर थांबवण्यास ९९ टक्के फायदा होतो आहे.
 
 
 
सिडनीच्या प्राध्यापक रॅना मॅकइंट्रे यांनी सांगितले की, लशीच्या माध्यामातून हर्ड इम्युनिटीचा अंदाज घेण्यासाठी आवश्यक असणारी ही आकडेवारी आहे. इस्रायलच्या मदतीने वास्तविक आकडे जमा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे फायजरने म्हटले आहे. या संशोधनात लशीचे दोन्ही डोस घेतलेले आणि एकही डोस न घेतलेल्यांचा अभ्यास करण्यात आला होता.