पुणे विद्यापीठ करणार ‘परीक्षा शुल्क’ परत

    दिनांक :22-Feb-2021
|
पुणे ,
गेल्या मार्च महिन्यात संपूर्ण देशात कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली होती.त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नव्हती 
या सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा  शुल्क भरावे लागले होते. आता हे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
 
 

abvp pune_1  H  
 
 
 
 

 अभाविपच्या मागणीला यश
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर मधील कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय करण्यात आला आणि अभाविपच्या मागणीला यश आले. “गेल्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा झालेली नसताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात आले होते, परंतु विद्यापीठ प्रशासन कोणताच निर्णय घेत नाही त्यामुळे आशा स्वरूपाचे तीव्र आंदोलन करावे लागले.” असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.