राहुल गांधी यांचा मिडास टच

    दिनांक :22-Feb-2021
|
नवी दिल्ली,
पुडुचेरी येथील काँग्रेस शासित सरकार आज पायउतार झाले. त्यावरून भाजपाच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत म्हटले कि, राहुल गांधी जिथे जातात तिथे आपला मिडास टच सोडून येतात. ते पुडुचेरीला गेले होते त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने तेथील सरकार पडले आहे.
 
rg_1  H x W: 0
 
पुडुचेरीमध्ये काँग्रेसचे भविष्य निश्चित करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झाले. यावेळी मुख्यमंत्री नारायण सामी यांनी संसदेत त्यांच्या सरकारकडे बहुमत असल्याचे सांगितले. परंतु नारायण सामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने काँग्रेसने दक्षिण भारतामधील शेवटचे राज्य गमावले आहे. पुडुचेरीचे नवनियुक्त राज्यपाल तमिलीसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही, नारायणसामी यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताधारी क्राँग्रेस-द्रमुक आघाडीतील बहुमत गमावल्याचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हे निर्देश दिले आहेत.
 
 
 
काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायण आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेश यांनी राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या कमी होऊन 11 झाली. तर विरोधी पक्षाचे 14 आमदार आहेत. माजी मंत्री ए. नमसिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव यांच्यासह काँग्रेसच्या चार आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. तर नारायणस्वामी यांचे जवळचे मानले जाणारे ए जॉन कुमार यांनीही या आठवड्यात राजीनामा दिला होता. माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि भाजपच्या केंद्र सरकारवर त्यांनी सरकार पाडण्याचा आरोप केला आहे.