सहाव्या क्रमांकावर संजयची जोरदार फटकेबाजी

    दिनांक :22-Feb-2021
|
चेन्नई,
उत्तराखंडने नाणेफेक जिंकून मेघालयला फलंदाजीसाठी भाग पाडले. मेघालयला सन्मानजनक धावसंख्या करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मेघालयच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना आश्वासक सुरुवात तर मिळाली. पण त्यांच्या बॅट्समनना मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन पुनीत बिष्टचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. बिष्ट 48 धावांवर बाद झाला. तर रवी तेजाही 44 धावांवर बाद झाला. यामुळे मेघालय अडचणीत सापडली होती. पण यानंतर संजय यादवने सहाव्या क्रमांकावर येत स्कोअरबोर्डला धावते ठेवले. संजयने 49 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 81 धावांचा किस पाडला. संजय शेवटच्या षटकात बाद झाला. 
 
sanjay _1  H x
 
उत्तराखंड क्रिकेट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिले. उत्तराखंडच्या टीमचा कोच वसीम जाफरला  दुर्देवीरित्या आपल्या पदाचा त्याग करावा लागला. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. पण यानंतर उत्तराखंड टीमने विजय हजारे करंडकात विजयी सलामी दिली आहे. सलामी फलंदाज जय बिस्टाच्या तुफानी शतकाच्या जोरावर टीमने प्लेट ग्रृपमधील मेघालयवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मेघालयने पहिले बॅटिंग करताना संजय यादवच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर 6 विकेट्स गमावून 242 धावा केल्या. उत्तराखंडने 243 धावांचे विजयी आव्हान 44.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले. सलामीवीर जय बिस्टाने 119 चेंडूत 18 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 141 धावांची शतकी खेळी केली. या विजयामुळे उत्तराखंडला एकूण 4 पॉइंट्स मिळाले.