पुन्हा टाळेबंदी ! परीक्षांंचं काय ?

    दिनांक :22-Feb-2021
Total Views |
-महाविद्यालयीन विद्यार्थी पुन्हा संभ्रमात
मनीष पांगारकर
नेर, 
एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मागीलवर्षी साधारण याच दरम्यान सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक अद्यापही आपला पिच्छा पुरवत आहे, असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.मध्यंतरी कोरोनाचा उद्रेक थोडा कमी झाला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी सुधारेल असे गृहित धरून शिक्षण मंत्रालयाने दहावी-बारावी परीक्षांंच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या होत्या. कधी आभासी व कधी शाळा महाविद्यालयात जाऊन कसेबसे रडतरखडत विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले होते.अनेकांनी तर आताकुठे वह्या पुस्तकांंची जमवाजमव करायला सुरुवात केली होती.
 

yav293_1  H x W 
 
 
 
 
 
परंतु फेब्रुवारीच्या सुरवातीपासून पुन्हा एकदा कोरोनाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढायला सुरुवात केल्याने मंडळाच्या परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आधीच विद्यापीठाच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. त्यातच आता मंडळाच्या परीक्षा कधी व कशा होणार, याचीच चिंता विद्यार्थना  लागली आहे.त्यातच कोरोना परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालय पुन्हा एकदा बंद झाल्याने त्यांना आभासी शिक्षणावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांची मानसिक अवस्था लक्षात घेता शासनाने वेळोवेळी विद्याथ्र्यांना विश्वासात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.