बुलडाण्यात 4 लाखाची घरफोडी

    दिनांक :23-Feb-2021
|
बुलडाणा,
कोरोना प्रतिबंधासाठी यंत्रणा उपाययोजना राबविण्यात व्यस्त असतांना, शहरात घरफोडी- चोरींचे प्रमाण वाढत आहे. 22 फेब्रुवारीला सुंदरखेड भागातील चेतना नगरात 4 लाखाची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 3 दिवसातील 5 चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांपुढे ह्या घटना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
 
buldhana_1  H x
 
खामगाव मार्गावर चेतना नगर दाटीवाटीने वसले आहे. येथे प्रशांत सोळंकी राहतात. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील 30 ते 40 हजार नगदी रुपये, जवळपास साडे 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास केल्याचे प्रशांत सोळंकी यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गवारगुरु, नापोकाँ गंगेश्वर पिंपळे करीत आहेत.