लग्नसमारंभातून परतणाऱ्या गाडीला अपघात

    दिनांक :23-Feb-2021
|
bihar _1  H x W
 
- बिहारमध्ये 8 ठार 
पाटणा,
बिहारमधील कटिहार जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पीयो गाडीचा भीषण अपघात झाला असून यात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कुर्सेला येथील रस्त्यावर हा अपघात झाला. तीन जण जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे.अपघातानंतर कुर्सेला विभागीय पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवासी पश्चिम बंगालचे असून विवाह समारंभासाठी जात होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.