वर्ष श्राद्धाला जातांनाच महिलेवर काळाची झडप

    दिनांक :23-Feb-2021
|
बुलडाणा,
नियतीचा डाव ओळखता येत नाही. मृत्यू कधी ओढावेल याचा नेम नाही. वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात असलेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुलडाणा तालुक्यातील साखळीकडे येत असतांना हा अपघात होऊन 32 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना आज 22 पेैब्रुवारीला दुपारी 1 वाजेच्या सुमारास ग्राम माळवंडी जवळ घडली आहे.
 
buldhana_1  H x
 
जालना जिल्ह्यातील अन्वा येथील गणेश सोनुने पत्नी अनिता सोबत बुलडाणा तालुक्यातील साखळी येथे आपल्या सासरवाडीत वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने येत असतांना माळवंडीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात दोन्ही पती-पत्नी जखमी झाले. मात्र अनिता गणेश सोनुने यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.